🕒 1 min read
जालना: दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढतच आहे. लातूर मध्ये एका पोलिसाला लुटल्याचा प्रकार घडला तर उमरगा मध्ये बँक लुटल्याचा प्रकार. चोरी आणि लुटमार सुरूच आहे. असाच प्रकार आता एका एसटी बस मध्ये सुद्धा घडल्याचे समोर आले आहे. एसटी बस मधील एका प्रवाशाचा खिसा कापल्याची घटना घडली आहे.
सोमवारी सकाळी जालना येथून एक प्रवासी सिल्लोडला जायला एसटी बस मधून निघाला होता. तिकडे त्याच्या नातेवाईकाच्या घरी लग्न असल्यानुले त्याने सोबत तीस हजार रुपये एवढी रक्कम ठेवली होती. पण प्रवासातच त्याच्या खिशातील पैसे गायब झाले. त्यामुळे एसटी बस थेट राजूर पोलीस चौकीत न्यावी लागली.
जालना-सिल्लोड या एसटी बसने हा प्रवाशी सिल्लोड साठी निघाला होता. त्याच्या खिशातील पैसे बस मध्ये बसण्याआधी चोरीला गेले की बस मध्ये प्रवासादरम्यान चोरीला गेले हे त्याच्या लक्षात आले नाही. जालना वरून निघालेली बस काही अंतरावर असलेल्या पीरपिंपळगाव येथे पोहोचली तेव्हा त्या प्रवाशाने सहज खिसा तपासून पहिला तेव्हा त्याच्या लक्षात आले कि खिशातील पैसे गायब आहेत.
गोंधळून गेलेल्या त्या प्रवासाने हा प्रकार बस वाहकाला सांगितला. बस वाहकाने थेट राजुरी पोलीस चौकीत बस नेली. तिथे सर्व प्रवाशांची तपासणी केली, मात्र पैसे कुठेच सापडले नाहीत. या वेळी दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सर्व प्रवाशांची तपासणी करूनही शेवटी पैसे न मिळाल्याने एसटी पुन्हा सिल्लोड कडे रवाना करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- महिला पोलिसांशी हुज्जत घालणार्या दोन फेरीवाल्यांवर गुन्हा
- लातूरमध्ये लोकांचा निष्काळजीपणा; सव्वापाच लाखांचा दंड वसूल
- ‘राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ’, मंत्री अशोक चव्हाणांची टीका
- इथे तर चक्क पोलिसांनाच मारहाण करून लुटले !
- ‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय ? याचा बदला घ्यावा लागेल’ ममतांचा अमित शहांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
