लातूर: लातूर जिल्ह्यात तसेच शहरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सामान्य लोकांना मारहाण करून लुटणाऱ्या चोरांनी आता आपला मोर्चा पोलिसाकडे वळवत पोलिसांनाच मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. या बहाद्दरांना आता कसलाच धाक नाही राहिला की काय असा प्रश्न पडला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश चिंचोलकर गार्डन परिसरातून जात असताना मध्येच त्यांची गाडी बंद पडली. तेवढ्यात तिथे दुचाकीवरून दोन चोर तिथे आले. त्या दोघांनी चारचाकीची काच फोडली आणि चिंचोलकर यांना मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी व रुपये २० हजार असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून तेथून त्यांनी पळ काढला.
या प्रकरणी योगेश चिंचोलकर यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनाच लुटल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण झाले आहे. चोरट्याची वाढती हिम्मत हे पोलिस प्रशासनासमोर नवे आव्हान आहे
महत्वाच्या बातम्या
- टीम इंडियाचं नवं वेगवान अस्त्र ; वन डे मालिकेसाठी दोन नव्या चेहऱ्यांना संधी
- ‘या’ बँकांमध्ये तुमच खात असेल तर ही कामे १ एप्रिल पर्यंत करा अन्यथा…
- पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा; आरपीआयला उपमहापौर पद?
- इंधनाचे दर कमी होण्य़ाची मावळली; इंधन जीएसटीच्या कक्षेत आणलं जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – सीतारमण
- ‘अनुष्काकडून काही शिक’ ; बाळाला सोडून फिरणाऱ्या करीनाला नेटकऱ्यांनी दिला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
