🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडताना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी व्हीलचेअरवरून प्रचार करण्यास सुरुवात केली. ममता बॅनर्जी व्हीलचेअरवरून कोलकताच्या गांधी मूर्तिजवळ पोहोचल्या होत्या. त्यानंतर गांधी मूर्तिपासून हाजरापर्यत ‘रोड शो केला.
त्यांनतर आज ममता यांनी मंगळवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बांकुडातील मेजिया इथं आयोजित प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. कोलकाता इथं बसून नोकरशाह विरोधात कट रचला जात आहे. गृहसचिवांना नोटीस पाठवली जातेय. तर अनेक उद्योगपतींवर छापेमारी सुरु असल्याचा आरोप ममता यांनी केलाय.
पश्चिम बंगालच्या जनतेला माहिती आहे की, ते ममता बॅनर्जी यांना रोखू शकत नाहीत. अशावेळी कोलकाता इथं बसून गृहमंत्री कट रचत आहेत. गृहसचिवांना नोटीस पाठवली जात आहे. निवडणूक काळात त्यांना का परेशान केलं जात आहे? सर्वांना बंद करता येईल, असं अमित शाह यांना वाटतंय का? निवडणूक आयोग कोण चालवतंय? अमित शाह तर चालवत नाहीत ना? असे प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांवर टीकेचा भडीमार केलाय.
इतकच नाही तर माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय? आम्ही समाजात शांतता प्रस्थापित केली आहे. पण पैशावर मतं ते घेणार! याचा बदला घ्यावा लागेल. मतांमधूनच याचा बदला घ्यावा लागेल, असं सांगत विजयाचा विश्वासही ममता यांनी व्यक्त केला आहे. असा घणाघात आज ममतांनी अमित शहा यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता सर्व देशाचे लक्ष लागलेल्या बंगाल निवडणुका दिवसेंदिवस अधिकच रंजक घडामोडींनी चर्चेत येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक, संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
- …म्हणून उच्चशिक्षित तरुणाने नाकारले भाजपने दिलेले तिकीट
- कॉंग्रेसला तगडा झटका देण्याच्या तयारीत पवार? मातब्बर नेता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार?
- ‘ऑस्कर २०२१’च्या नामांकनाची घोषणा; प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने केली घोषणा
- आता सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए येणार पदव्युत्तर पदवीच्या समकक्षेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
