🕒 1 min read
नागपूर : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका अवघ्या एक दिवसावर आल्या आहेत. उद्या म्हणजेच १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी आणि ऐनवेळी काही मागण्यांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या नव्या सूत्रानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असल्याने राज्यातील जनता महाविकास आघाडीला कौल देणार की भाजप आपली वर्चस्व राखण्यात यशस्वी होणार याकडं सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेत आहेत. काल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात बोलताना महाविकास जोरदार निशाणा साधला आहे.
‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं’ असं देखील गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
- मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला; ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका’
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
