Share

मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला; ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, अद्याप आरक्षणावर ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर ८ डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाईल असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.महावितरणमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थी तरुणांची भरती झाली नाही. त्याच्या निषेधार्थ १ आणि २ डिसेंबर रोजी राज्यातील महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी प्रत्येक जण वाहनातून विधान भवन येथे धडक मोर्चा काढणार आहे. पण एखाद्या वेळेस अधिवेशन पुढे घेतल्यास पुढील दिशा देखील लवकरच ठरविली जाईल,” असं कोंढरे यांनी सांगितलं.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला मराठा समाज आरक्षण मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येत नाही, हा प्रश्न प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, असं खासदार उदयनराजे काल साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. उत्तर द्या, अन्यथा ज्या समाजानं तुम्हाला सत्तेत बसवलं तोच समाज तुम्हाला सत्तेतून खाली उतरवेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाची टक्केवारी राखून ठेवत  इतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!