मुंबई : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. आताही पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या कायद्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
केंद्र सरकारच्या तिन्ही कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्माने ट्विट केले आहे. शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून संतापलेल्या कपिल शर्माने या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन केले आहे.
‘कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याल प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका’, असे आवाहन कपिल शर्माने केले आहे. ‘आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत’, असे म्हणत त्यांने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
किसानो के मुद्दे को राजनीतिक रंग ना देते हुए बातचीत से इस मसले का हल निकालना चाहिए।कोई भी मुद्दा इतना बड़ा नहीं होता के बातचीत से उसका हल ना निकले।हम सब देशवासी किसान भाइयों के साथ हैं। यह हमारे अन्नदाता हैं।#farmers
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2020
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला


