मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ वाढला आहे. महाविकास आघाडी च्या नेत्यांनी चांगलीच धावपळ सुरु आहे. भाजपचे सर्व आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जमू लागले आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ हेही बाळासाहेब थोरात यांच्या घरी पोहोचले आहेत. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव यांनी दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
२०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकार बदलले तर होणाऱ्या अडचणींसाठी टाळण्याठी होणारी तजबीज असल्याची चर्चा आहे. राज्यातील सरकार राहील की जाईल, याची शाश्वती महाविकास आघाडीला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला. सर्वांना सायंकाळी ५ वाजता उद्धव यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही आमदार पोहोचला नाही तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. शिवसेनेचे फक्त ३ मंत्री बैठकीत उपस्थित नव्हते.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचे सांगितले. फडणवीस यांच्या संपर्काबाबत शिंदे म्हणाले की, मी भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही.
महत्वाच्या बातम्या :


