मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाले आहे. शिवसेनेच्या ३५ आमदार काल रात्री अडीच वाजता सुरत येथील हॉटेलमधून आसामच्या गुहाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवण्यात आले होते. आता यावर शिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्या सोबत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे ४६ आमदार आहेत. आता या आमदारांना मुंबईत आणणार की नाही ती प्रक्रिया पार पाडून निर्णय घेऊ. मात्र मला गटनेतेपदावरून हटवणे हे अवैध आहे. असं मला गटनेतेपदावरून हटवता येत नाही. आमदारांच्या बहुमताने गटनेता निवडता येतो. त्यामुळे अजय चौधरी यांची निवड ही चुकीची आणि घटनाबाह्य आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान राज्याच्या राजकारणात भूकंप आल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार बरखास्तीचा प्रस्ताव ठरवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या :


