मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 46 आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता महाविकासाआघाडीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकार कोसळण्याच्या दिशेने सध्या घडामोडी सुरु आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत.
आमदार नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याचे राऊत म्हणालेत. सुरतमध्ये राहणाऱ्या काही आमदारांशी मी बोललो आहे. त्यांपैकी काहींना परत यायचे आहे. परंतु त्यांना परवानगी दिली जात नाही. सर्व आमदार ‘निष्ठावान शिवसैनिक’ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मात्र आमदारांवर दबाव निर्माण केला जात आहे. आमदार नितीन देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांनी फोन करुन सांगितले. त्यांना महाराष्ट्रात यायचे होते, असं राऊत म्हणालेत.
यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जबरदस्ती ठेवलं असतं तर आमचे लोकं त्यांना सोडण्यासाठी गेले असते का?, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. तसेच राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :


