Share

Sanjay Raut : एकनाथ शिंदे माझे जिवाभावाचे मित्र – संजय राऊत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे, अशातच आता संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबद मोठे विधान केले आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून आमचे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र आहेत. आज सकाळीच माझं त्यांच्याशी जवळपास १ तास बोलणं झालं आहे. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेबाबत मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही माहिती दिली. लवकरच शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदार स्वगृही परततील”.

पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक –

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. आमचे सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

महत्वाची बातमी –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!