मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.
या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतलेली आहे. ‘ रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी आज केले आहे.
कोरोनामुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत, त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लस, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘नवाबभाई ये पब्लिक है, सब जानती है’, गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
- हेल्मेट न घालणे कायद्याचे उल्लंघन, पण निष्काळजीपणा नाही; हायकोर्टाचा निर्णय
- ‘कोरोनावर राजकारण नको, त्यासाठी पुढे दिवस आहेतच’, बाळासाहेब थोरातांचा भाजपला टोला
- ठाकरे सरकारविरोधात नाभिक समाजबांधवांचे मुंडण आंदोलन
- चिंताजनक! देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग नाशिकमध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

