🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज सकाळी गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडेंनी आर्यन खानचं अपहरण केलं आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मी मागणी केली होती. त्यानंतर एक नव्हे तर दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. एक राज्य सरकारने आणि दुसरी केंद्र सरकारने स्थापन केली आहे. आता कोण वानखेडेंचा आणि त्यांच्या खासगी आर्मीचा पर्दाफाश करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, मात्र यावेळी त्यांनी पहिल्यांदाच वानखेडेंवर आर्यन खानच्या अपहरणाचा आरोप केला आहे.
I had demanded an S.I.T probe to investigate Sameer Dawood Wankhede for kidnapping of & ransom demand from Aryan Khan.
Now 2 S.I.Ts are constituted (state & centre), let us see who brings out the skeletons from the closet of Wankhede and exposes him and his nefarious private army— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 6, 2021
दरम्यान, आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून आज सहा अधिकारी येणार असून प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे. दिल्लीतील एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंग हे सुद्धा आज मुंबईत येणार आहेत. संजय सिंग हे आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार आहेत. तसेच वानखेडे यांची मुंबईतून दिल्लीत बदली करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, वानखेडे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मी मुंबई एनसीबीतच आहे. माझी दिल्लीत बदली करण्यात आलेली नाही, असं सांगतानाच मला तपास कामातून वगळण्यात आलेलं नाही, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजप नेते मोहित कंबोज आज नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्कॉटलंडवर भारताचा दणदणीत विजय
- भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना जडेजाने सुनावले, म्हणाला..
- कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
