मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील निर्बंध आजपासून शिथिल होणार आहेत. मॉल, रेस्टॉरंट, दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत आणि खासगी कार्यालयांना २४ तास खुली ठेवण्याची मुभा ठाकरे सरकारने दिली आहे. मात्र, लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, तेथे जास्तीत जास्त २०० संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीनिशी परवानगी देण्यात आलेली आहे मात्र ही मर्यादा १०० या पेक्षा जास्त असणार नाही.
उपहारगृहांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना ५० टक्के मर्यादेने रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
खासगी आस्थापनांना २५ टक्के उपस्थितीसह २४ तास कार्यालये खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यापेक्षा वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलावले जावे, अशी यामागची कल्पना असल्याचे ठाकरे सरकारने स्पष्ट केलं आहे.
कोरोना लसीचे दोन डोस आणि दुसऱ्या डोसनंतर किमान १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर प्रवाशांना लोकलचे पास दिले जातील. तसंच बेकायदेशीररित्या प्रवास केल्यास ५०० रुपये दंडासह कारवाई केली जाणार आहे.
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही निर्बंध शिथिल केले आहेत. पण, संकट टळले आहे असं आपण म्हणू शकत नाही. जगात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोकांनी धोका लक्षात घ्यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान म्हणाले.
आजपासून काय सुरु होणार?
दुकानांच्या वेळाही रात्री १० वाजेपर्यंत वाढविल्या
मॉलमध्ये जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होणे आवश्यक
धार्मिक स्थळे, मंदिर आणि प्रार्थनास्थळे बंद
चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे बंदच
इनडोअर खेळांसाठी सर्व खेळाडू व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले असतील तरच परवानगी
महत्वाच्या बातम्या
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

