Share

मनसेच्या पदाधिकाऱ्यांमुळे आमदार निलेश लंके यांच्या हातून होणारी मोठी चूक टळली!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- डॉक्टर रामेश्वर बंडगर याच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते काल होणार होते. परंतु रामेश्वर बंडगर यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर डॉक्टरवर कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार स्थानिक पोलीस स्टेशनने या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणारी मोठी चूक टळली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील आधार हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर रामेश्वर बंडगर यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

काल बोगस डॉक्टर बंडगर याच्या नवीन दवाखान्याचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार होते. हे उदघाटन देखील पोलिसांनी तातडीने रद्द केले आहे.  याबाबत अधिक माहिती देताना यादव म्हणाले, डॉक्टर बंडगर हे साईधाम रुग्णालयाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मला मिळाली. ही माहिती मिळताच मी सदर बाब तातडीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांनी देखील याबाबत चौकशी करून सदर डॉक्टरवर तसेच आधार हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार साईधाम हॉस्पिटलच्या उद्घाटन देखील रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये या डॉक्टर व आधार हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा डॉक्टर साईधाम हॉस्पिटल नावाने नवीन दवाखाना शिक्रापूर येथे सुरु करत होता. कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश असतांना सदर बोगस डॉक्टरचे हे धाडस म्हणजे आरोग्य विभागाच्या कामाला काळिमा फासणारे असून, तालुका आरोग्य अधिकारी असणाऱ्या आर.डी.शिंदे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यादव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!