Share

लॉकडाऊनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कायम विरोधच : सुमित खांबेकर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : प्रशासनाच्या तसेच राज्यसरकारच्या मनमानी कारभारावर आमचा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुर्णपणे विरोध असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सोमवारी सोशम मिडीयाच्या माध्यमातून ही भूमिका मांडली आहे.

मागच्या वर्षी कोरानाबाबत भारताला काय तर जगाला या कोरोनाबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळे मागच्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन घोषीत केले होते. परंतू आता कोरोना संसर्ग वाढत असताना वर्ष उलटून गेले आहे. परंतू औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केलेली ही बाब अत्यंत चुकीची आहे. तर महाराष्ट्र शासन तसेच येथील जिल्हा प्रशासन हे कोराना रुग्ण वाढत आहे, हे बरोबर आहे, पण येथील लोकप्रतिनिधीला विचारणा करुन तुन्ही निर्णय घेवू शकला असता, परंतू प्रशासानाने कोणालाही विश्वासात तसेत न सांगता लॉकडाऊनचा निर्णय घेवून टाकला. हे योग्य नाही. तसेच शहरातील अनेक भागात हातावर पोट असणारा वर्ग, कामगार, नौकरदार, व्यवसाय करणारे लोक आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नसल्याचे या वेळी खांबेकर यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्हा मधील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह इतर लोकांमधून निवडून आलेल्यांना प्रशासनाने विचारले का ? काय हो लॉकडाऊन करणे कसे असेल. तर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या लॉकडाऊनचा विरोध केला नाही. केवळ खासदार इम्तियाज जलील यांनी पडखडपणे भूमिका मांडून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. खरच मी त्यांचे अभिनंदन करेल, की ठाेस भूमिका तर मांडली. तर शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे. या विषयी माझा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भूमिका विरोधाची असल्याचे या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!