🕒 1 min read
मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या. यामध्ये ग्रामीण भागासाठी सुविधा आणि दळणवळण संदर्भात घोषणा महत्वाच्या केल्या गेल्या, पाहूया सविस्तर…
ग्रामीण भागासाठी सुविधा आणि दळणवळण घोषणा –
१) महाराष्ट्रात मिशन महाग्राम राबवले जाणार. त्यासाठी 500 कोटी दिले जाईल.
२) घरकुलांसाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित सांगितला.
३) सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते 15 हजार 773 आणि बांधकाम 1 हजार 88 कोटी रूपये प्रस्तावित
४) समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.
५) जालना ते नांदेड मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
६) नाबार्डने मंजूर केलेल्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येईल.
७) शिर्डी विमानतळाच्या कामासाठी 150 कोटी, रत्नागिरीसाठी 100 कोटी. अमरावती आणि कोल्हापूर विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. गडचिरोलीत नवीन विमानतळ प्रस्तावित. कुलाबा, वांद्रे, सिप्झ या मेट्रोच्या मार्गिका विस्तारित करण्याचे नियोजन आहे.
८) 3000 नवीन बस गाड्या परिवहन विभागाला उपलब्ध करून देणार.
९) रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादनासाठी 100 कोटींचा निधी.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
