Share

Assembly Monsoon session | अखेर पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला!, 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन पार पडणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापन केले त्याला १ महिन्याहून अधिक काळ लोटला. मात्र तरीही हे सरकार मंत्रीमंडळ विस्तार केलेला नाही. तसेच राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यासाठी सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन हे बहुतेक वेळा जुलै महिन्यातच पार पडते. या वर्षी होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार होते. मात्र तेव्हा ते पुढे ढकलण्यात आले होते. मात्र तेच अधिवेशन आता 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. अधिवेशनासंदर्भात विधिमंडळातील अधिकाऱ्यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. त्यातच हा मुहूर्त ठरला असल्याचं बोललं जात आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान, भंडाऱ्यात झालेली लैंगिक अत्याचाराची घटना यांमुळे सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करून पावसाळी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर आता येत्या २ दिवसात म्हणजेच अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

उद्या राजभवनात शपथविधी
आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले होते. तेव्हाच या दोन्ही नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. उद्याच्या पहिल्या टप्प्यात १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात १०-११ ऑगस्ट दरम्यान शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे म्हटले होते. त्याचवेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ ऑगस्टपूर्वी किमान १२ मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचे गृहखाते सांभाळतील अशीही बातमी आहे. उद्या राजभवनात सकाळी ११ वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!