बीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील सुर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज यांनी आत्महत्या करण्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. गेल्या 24 तासांपासून महाराजांचा शोध सुरू असून अद्यापपर्यंत महाराज मिळून आले नाहीत. गेवराई तालुक्यातील नागरिकांसह पोलिस प्रशासन त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला होता. तेव्हापासून ते फरार होते.
व्हिडिओ, सुसाइड नोट व्हायरल झाल्यावर पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली. महाराजांची शोधाशोध सुरू झाली. चकलांबा पोलिस, नेकनूर पोलिसही शोध घेत होते. पथके रवाना करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभर त्यांचा शोध लागला नाही.
व्हिडिओमध्ये महाराज काय म्हणाले
३० जानेवारी रोजी मला पीडित कुटुंबियांनी चहासाठी बोलावले, मी गेलो. त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेला होता तो बदला म्हणालो. त्यांनी घर बांधकाम करणार आहे म्हणत २५ हजार उसने मागितले. कीर्तने बंद असल्याने पैसे नसल्याचे मी म्हणालो. जेवणाचा आग्रह केला मात्र मी थांबलो नाही. ३१ जानेवारी रोजी पुन्हा जेवणासाठी बोलावले. मी घरी गेल्यावर कुटुंब प्रमुख बाहेर गेले. घरी मुलगी एकटी असल्याने मी न जेवताच परत आलो. दुसऱ्या दिवशी ते लोक संस्थानवर आले. मुलीच्या विनयभंगाचा आरोप करून मारहाण केली, व्हिडिओ करून तो व्हायरल करण्याची व गुन्हा नोंदवण्याची धमकी देत ५ लाख मागितले. मी पैसे देण्यास नकार दिला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा ४ लाखांची मागणी केली. नकार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला. या कुटुंबाला यापूर्वीही मी दोन वेळा १० हजार रुपये उसने दिले होते. त्यांनी ते परतही केले. मात्र आता पैसे नसल्याने नकार दिला. सरपंच अॅड. उद्धव रासकर यांच्यामुळे गुन्हा नोंद झाल्याचे सांगत महाराजांनी त्यांच्यावरही आरोप केला. त्यांना संस्थानचे सचिव व्हायचे होते म्हणून माझ्याविरोधात कट केल्याचे महाराज म्हणाले. इतर ८ ते १० जणांची नावे महाराजांनी घेतली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !
- ‘पेग्वीन’ सेनेनं पूर्णपणे शरणागती पत्करलीय
- पवार ना कधी क्रिकेट खेळले ना कुस्तीत उतरले, तरीही ते समित्यांचे अध्यक्ष होते; सदाभाऊंचा टोला
- ‘२०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल
- देशात काय मोगलाईचं राज्य आहे का ? अजित पवार संतापले


