Share

देशात काय मोगलाईचं राज्य आहे का ? अजित पवार संतापले

Published On: 

अमरावती : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

या आंदोलनाला तब्बल ७५ दिवस उलटून देखील शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील वादावर कोंडी फुटलेली नाही. याच वरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ते सद्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना देशात मोगलाई आहे का ? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.

‘शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का ? असा संतप्त सवाल अजित पवारांनी केला आहे. तर, ‘केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीचे अनुदान बंद केले. शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. एकूणच केंद्र सरकार शेतकरीविरोधी भूमिका का घेत आहे, हे कळायला मार्ग नाही. पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!