मुंबई : देशाबाहेरील कलाकारांनी या शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने देशातील एकता जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.
हे प्रकरण सद्या जगभरात गाजत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला आणि प्रामुख्याने शिवसेनेला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शेलार यांनी इंग्रजीत ट्विट केलं असून, काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारकडे सचिन तेंडुलकर आणि लता दिदीनी केलेल्या सपोर्ट युनायटेड इंडियाच्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पहिल्यांदा पालघर, त्यानंतर मेहकला सूट, शर्जीलची सुटका आणि आता सचिनच्या चौकशीची मागणी. सत्तेच्या लालसेपुढे शिवसेनेनं महाराष्ट्र, आपल्या देशाचे आयकॉन आणि भारतालाही दूर सोडलं. पेंग्वीन सेनेनं पूर्णपणे शरणागती पत्करलीय, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलं आहे.
Cong DEMANDS MVA Govt INVESTIGATE Sachin Tendulkar, Lata Didi for tweets supporting United India !
First Palghar, then free Mahek,escape Sharjil, NOW Enquiry of Sachin !
Greed for power made Sena abandon Maharashtra, Our icons & India !
Penguin ???? Sena Surrender is COMPLETE !— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का, शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
- …म्हणून भिकारड्या शिवसैनिकांच्या पोटात दुखणारचं, निलेश राणेंचा प्रहार !
- पवार ना कधी क्रिकेट खेळले ना कुस्तीत उतरले, तरीही ते समित्यांचे अध्यक्ष होते; सदाभाऊंचा टोला
- पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार : रामदास आठवले
- देशात काय मोगलाईचं राज्य आहे का ? अजित पवार संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

