मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवला होता. यानंतर, काँग्रेसने नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वा. ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. राज्यातील काँग्रेसची सूत्र आक्रमक नेत्याकडे जावी अशी इच्छा व्यक्त केली जात होती. त्यामुळेच नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी आज एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा मानस दर्शवला आहे. ‘ध्या राज्यात आम्ही चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहोत ही वस्तुस्थिती मान्य केलीय, पण काँग्रेस हा असा शुन्य आहे ज्याच्या जवळ विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल,’ असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !
- …म्हणून भिकारड्या शिवसैनिकांच्या पोटात दुखणारचं, निलेश राणेंचा प्रहार !
- पवार ना कधी क्रिकेट खेळले ना कुस्तीत उतरले, तरीही ते समित्यांचे अध्यक्ष होते; सदाभाऊंचा टोला
- पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवणार : रामदास आठवले
- देशात काय मोगलाईचं राज्य आहे का ? अजित पवार संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

