मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटरवर मोदींना सवाल केले गेले आहेत.
मागील सात वर्षांत मोदींनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले व आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम मोदींनी आखून ठेवला.भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले. असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहेत.
या काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत.#ModiDisasterForIndia
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 31, 2021
एवढेच नाही तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. असे ट्वीट करत राष्ट्रवादीने मोदींवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ सूचना
- भीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभ हा केवळ स्तंभ नाही तर…- जितेंद्र आव्हाड
- नववर्षाच्या पहिल्या दिवशी १० कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान देणार पीएम किसानचा हप्ता
- ‘अनेक संकटं येऊन गेली पण समाधान याचे की…’,फडणवीसांकडून नवंवर्षाच्या शुभेच्छा
- …म्हणून बैलगाडा शर्यत हणून पाडली; आढळराव पाटलांचा प्रशासनावर आरोप


