Share

बैलगाडा शर्यतीच्या स्थगितीसंदर्भात अजित पवारांनी केले भाष्य;म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी ३० डिसेंबर रोजी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतीचे काय?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या पार्श्वभूमीवर आज (१ जाने.) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याविषयी भाष्य केले आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना पवार म्हणाले की, “हे जगावर आलेले मोठे संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी”, असे पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे सांगितले आहे की स्पर्धा भरवा, पण त्याची परवानगी तिथल्या स्थानिक प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायला हवी. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देताना राज्य सरकारच्या पातळीवर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. त्यांनी ती अंमलबजावणी करावी’, असे पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!