Share

निवडणुकीपूर्वीच अखिलेश यादवांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश: काही दिवसांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाचे विधानपरिषदेचे सदस्य आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री शतरुद्र प्रकाश यांनी शुक्रवारी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शतरुद्र प्रकाश यांनी लखनौ येथील भाजप मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (Bjp) प्रवेश केला आहे. यावेळी शतरुद्र प्रकाश (Shatrudra Prakash) यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही १९६३ पासून आजतागायत बिगर-काँग्रेसी राजकारणाशी जोडलेलो आहोत. राजनारायण यांनी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेली मतदारसंघातून पराभव केला होता. पण आता मला हे सांगताना खेद वाटतो की समाजवादी चळवळीला उतरली कळा लागली आहे.”

दरम्यान निवडणुकीपूर्वीच अखिलेश यादव यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण शतरुद्र प्रकाश यांच्यासोबतच त्यांच्या समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.दरम्यान शतरुद्र प्रकाश १९८९ मध्ये मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये प्रकाश हे कॅबिनेट मंत्रीही होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!