Share

मुंबईतून खरेदी केलेले मॅफेड्रोन शहरात विकणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी

Published On: 

औरंंगाबाद : मुंबई येथून खरेदी करून आणलेले व्हाईट मॅजिक नावाने ओळखला जाणाऱ्या प्रतिबंधित मॅफोड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या जुनेद खान जावेद खान (वय २५, गल्ली क्र. ७, बारी कॉलनी) या तस्कराला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अटकेत असलेल्या तस्कराला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी दिले आहेत.

अंमली पदार्थाची तस्करी करून विक्रीसाठी एक जण कर्णपुरा मैदानात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्तांच्या विशेष पथकाने कर्णपुरा भागात सापळा रचून रंगेहाथ जुनेद खान याला पकडले.

त्याच्या ताब्यातून पथकाने ६.७३ ग्रॅम मॅफोड्रोन नावाचा अंमली पदार्थ आणि मोबाइल असा एक लाख १६ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चौकशीदरम्यान जुनेद खान याने सदरील अंमली पदार्था मुंबईतील आदील नावाच्या व्यक्तीकडून विकत आणले असल्याची कबूली पोलिसांना दिली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!