कोल्हापुर: शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. रविवारी सांगली जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण चे कार्यालय जाळले. तसेच दिवसा दहा तास वीज मिळाली पाहिजे, तेव्हाच आंदोलन मागे घेणार, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हिंसेने प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडायला संवाद असतो. त्यांना मी सांगितलं माझ्याशी चर्चा करा जे शक्य असेल ती मी भूमिका घेईल. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यामुळे हिंसेतून काही विपरीत घडल्यास त्याला सर्वस्वी राजू शेट्टी जबाबदार राहतील, असं राऊत म्हणाले आहेत.
यावर राजू शेट्टी प्रत्युत्तर देत म्हणाले, ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या दरांची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकली तर काय होईल विचार करावा, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं’ – वामराव चटप
Russia Ukraine war:रशिया युक्रेनशी युद्धबंदीचा करार करण्यास तयार : रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की
Maratha Reservation: संभाजीरजेंच्या डोळ्यात अश्रू; तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
भारतीय संघाचे आरामात मालिकाविजय मात्र सुनील गावस्करांना सतावतेय ‘या’ गोष्टीबाबत चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

