मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अगदी थिएटर्स पासून ते सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तेही उद्यापासूनच सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते.
यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून याबाबत स्थानिक स्तरावर आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, हा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं माहिती व जनसंपर्क खात्याकडून सांगण्यात आलंय.असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने काही तासातच स्पष्ट केल्याने या विषयावरील सरकारी गोंधळ समोर आला.
या गलथान कारभारामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली असून सरकारच्या कारभारावर भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कुठेही समन्वय नाही. तीन पक्षात नाही तर एक-एका पक्षातील नेत्यांमध्येही समन्वय नाही. सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आधी निर्णय जाहीर करण्याची घाई करायची. मग मुख्यमंत्री कार्यालयानं त्यावर स्पष्टीकरण द्यायचं. काल मुंबईत रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला परवानगी म्हणून दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. लॉकडाऊन बाबत तत्त्वत: मान्यता असूच कशी शकते. हे सरकार दिशाहीन बनलंय. या संभ्रमामुळे जनता भरडली जात आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- भारतीय संघाला फायनलमध्ये ‘या’ गोष्टीचा होऊ शकतो फायदा
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- …त्यामुळे ऑस्ट्रेलियात थांबण्याचे बळ मिळाले : मोहम्मद सिराज
- अभिनेत्री दिशा पटानीने कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

