औरंगाबाद : ओबीसी समाजाला शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या संपवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. राज्य सरकारने त्वरित मागासवर्गीय आयोग नेमून न्यायालयासमोर बाजू मांडावी. तसेच ओबीसींना दिलेले आरक्षण पूर्वीप्रमाणे द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा आघाडीच्या वतीने करण्यात आली. ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीदिनी क्रांती चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले.
न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.
ते पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपने राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू केल्याची माहिती आमदार अतुल सावे यांनी दिली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापू घडमोडे, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, सुहास शिरसाठ आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
- अभिनेत्री दिशा पटानीने कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
