मुंबई : मागिल दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे माणूस त्रस्त होता. ती परिस्थिती जाऊन आता कुठे सगळं व्यवस्थित होत होतं तर आता प्राण्यांसाठीचा आजार पसरत आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. यावरून अनेक विरोधकांनी सरकारला सुनावलं आहे. अशातच लम्पी या आजारावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा करत पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
लम्पी आजार नरेंद्र मोदींनी भारतात चित्ते आणल्यामुळे झाला आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणण्यात आले. सात दशकांहून अधिक काळ देशातून नामशेष झालेल्या या विशिष्ट प्रजातींचे पुनरागमन झालं असून, या चित्यांना नामिबियातून आणणेल्या या चित्त्यांना मध्यप्रदेशमधील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलं आहे.
राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहण्यासही त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलणं हे सूर्यासमोर दिवा दाखविण्यासारखं आहे”
- IND VS SA । नाकातून रक्त येत होते पण रोहितने मैदान सोडले नाही; नेमकं काय घडलं?
- Nilam Gorhe | “भाजपने ‘या’ तिघांना रोजगार दिला”; नीलम गोऱ्हे यांची सडकून टीका
- Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का ?, नारायण राणे म्हणाले…
- Health Tips | Overeating ची सवय आहे धोकादायक, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

