Share

Nilam Gorhe | “भाजपने ‘या’ तिघांना रोजगार दिला”; नीलम गोऱ्हे यांची सडकून टीका

Published On: 

पुणे : शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्याला चांगलाच टोला लगावला आहे. “भाजपने तिघांना रोजगार मिळवून दिला असल्याचं म्हणत त्यांनी नावंदेखील सांगितली आहेत.  “किरीट सोमय्या, नवनीत राणा आणि नारायण राणे यांना फक्त भाजपने रोजगार मिळवून दिला आहे” असा टोला नीलम गोऱ्हे यांनी यावेळी लगावला आहे.

वेदांतावरून आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीका केली जात आहे. त्याशिवाय मुंबईतील दोन्ही दसरा मेळाव्याची  तुलना केली जात आहे. मात्र, आमचा पारंपारिक मेळावा आहे. आमचा मेळावा वाजतगाजत होईल. आमची शक्ती दिसेल. अद्भूत असा मेळावा होणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी बोलताना त्यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. अंधेरी विधानसभा निवडणुकीत आमचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. रमेश लटके यांचे काम चांगलं आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असं सांगतानाच चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विकासाचे राजकारण तर सोडाच पण पायात खोडा घालण्यासाठीच यांना महत्व दिले जात असल्याचे गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सांगितले. उट-सूठ शिवसेनेवर टीका करणे हे त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. याबरोबरच शिंदे- फडणवीस सरकारवर देखील नीलम गोऱ्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे. विकास कामात राजकारण न करता ते काम अविरतपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र असं न करता या सरकारकडून प्रत्येक कामाला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!