Share

Chandrashekhar Bawankule | “नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलणं हे सूर्यासमोर दिवा दाखविण्यासारखं आहे”

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले. आता शिंदे-फडणवीस सरकारला जवळजवळ तीन महिने होत आले आहेत. तसेच या सरकारने मंत्री मंंडळाचा विस्तारही केला असून, शनिवारी 24 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या नावंची यादी जाहीर करण्यात आली. यावरून अनेक चर्चा रंगल्या असल्याचं दिसून आलं. यामध्ये राजाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक -दोन नाहीतर चक्क सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक टीका होत आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे  ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलणं हे सूर्यासमोर दिवा दाखविण्यासारखं आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना चांगलंच फटकारलं आहे. बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, नाना पटोले हे गोंधळलेले आहेत. आता त्यांचा बॅलन्स सुटला आहे.

त्याचबरोबर, नाना पटोले यांना कुणी सिरीअस घेत नाहीत. ते पत्रकार परिषदा घेता राहतात. राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याचं दाखवत राहतात. आपलं अध्यक्षपदं टिकवत राहतात. त्यांना तुम्हीही सिरीअस घेऊ नका, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांना चांगलाच टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्षमता राज्यानं बघीतली आहे. त्यांचे काही खासगी व्यवसाय नाहीत. खासगी कारखाने नाहीत. त्यांच्या सोसायट्या नाहीत. फडणवीस हे 18 तास जनसेवेकरिता देताहेत. सहा नाही आठ जिल्हे सांभाळू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितले.

नाना पटोले यांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्ये देण्यात आले. त्यावरून  सर्वात  गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार?  हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का?, असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!