Share

निवडणूक निकालानंतर कुठेच नसलेले काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्तेची लॉटरी- राम शिंदे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना आजाराने जनता त्रस्त झाली आहे पण राज्य सरकारला त्याचे काही देणे-घेणे नाही. राज्यातील सरकार फक्त राजकारणच करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी तसेच सामान्य जनतेला मदत करीत आहे. पण अद्याप राज्य सरकारने कुठलीही जनतेला मदत केली नाही. असे चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळत आहे. अशी टीका माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राम शिंदे उपस्थित होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

प्रा.राम शिंदे पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीला कळून चुकले होते की आपण कुठेच नाही. मात्र आता त्यांना सत्तेची लॉटरी लागली आहे. राज्यातील सरकारला अनेक क्षेत्रात अपयश आले आहे. लोकांचा विकास, रस्ते, शेतकऱ्यांचे पंचनामे अशा प्रश्नांवर सरकार बोलण्यास तयार नाहीत. राज्य सरकारने दोन दिवस अधिवेशन घेतले. मात्र त्या अधिवेशनात एका पत्रकार व एका सेलिब्रिटीवर सरकारने प्रस्ताव आणला. यावरूनच राज्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही हे दिसून येते, असे प्रा.शिंदे म्हणाले.

कोरोनाचे संकट येऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला आहे. तरी रुग्णांना सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. या सरकारच्या काळात मोठे घोटाळे झाले आहेत. केंद्र सरकारने लोकांसाठी दिलेले अन्नधान्य पोहोच करण्याची दानत सुद्धा राज्य सरकारमध्ये राहिलेली नाही अशी टीका प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!