Share

‘…त्यावेळी पवारांनी अन्नत्याग केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते’

Published On: 

अहमदनगर : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज बांधव कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. अशात याच मुद्द्यावरून भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

‘शरद पवार यांनी राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग केला. मात्र पवार यांनी हा अन्नत्याग ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते,’ अशी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली. ‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,’ असा आरोप ही त्यांनी केला.

दरम्यान, केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळं निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवार यांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!