Share

विदर्भातील या शहरात उभारण्यात आली पर्यावरण पूर्वक दहन व्यवस्था 

Published On: 

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे दहन घाटवरील वर्दळ सध्या प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसात घाटांवर जागा उपलब्ध नसल्याने अंत्यसंस्कारानासाठी रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. हि स्थिती नियंत्रणात राहावी या उद्देशाने शहरातील मोक्षधाम घाटावर पर्यावरण पूरक शवदहन व्यवस्थेचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांना करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काटगाये, हर्षला साबळे, नगरसेवक विजय चुटेले, कार्यकारी अभियंता अजय मानकर, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, राकेश भोयर, मिथुन बोंदले, अभय बावने आदी उपस्थित होते.

मोक्षधाम घाटावर पर्यावरणपूरक शवदहन व्यवस्था उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घाटावर शवदहनानंतर निघणार्‍या धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास व्हायचा, या प्रकल्पामुळे तो आता होणार नाही. मोक्षधाम घाटावरील धुरविरहित पर्यावरणपूरक शवदहन प्रकल्प हा नागपूर शहरातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी विशेष प्रयत्न केले होते. सदर प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी पुढाकार घेत २.५0 कोटी निधी मंजूर केला होता.

अंतर्गत पहिल्या टप्प्यात मोक्षधाम घाटावर ७ पर्यावरणपूरक शवदहन कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ७ कक्षांचे महापौर संदीप जोशी यांनी लोकार्पण केले. लवकरच दुसर्‍या टप्प्यातील ७ शवदहन कक्षांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती मनपाचे क्रीडा समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक प्रमोद चिखले यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!