Share

अजितदादा म्हणतात वरिष्ठांचं ऐकूनच ‘ते’ ट्विट डिलीट केलं…

Published On: 

मुंबई : भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी डिलीट केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. मात्र आपण हे ट्विट का डिलीट केले याचा खुलासा खुद्द अजित पवारांना केला आहे. ‘समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली.

याविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, ‘ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात.’ आता हे वरिष्ठ म्हणजे कोण हे नव्याने सांगायला नको तर अजित पवारांचे भाजप प्रेम त्यांना अजून देखील खटकत आहे हेच पुन्हा सिद्ध होत आहे.

अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशी चर्चा रंगली होती.

ajit pawar twit

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!