बुलडाणा : मातृतिर्थ मॉ. साहेब जिजाऊ यांच्या बुलडाणा जिल्ह्याचे वैभव ठरणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भात आमदार संजय गायकवाड यांच्या विनंतीवरून गुरुवार, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दालनात दुपारी ११ वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव यांच्या वतीने आ. डॉ. संजय रायमुलकर, पुतळा समितीच्या वतीने आ. संजय गायकवाड, पुतळा समितीचे अध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील, न. प. उपाध्यक्ष विजय जायभाय, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदळे, नगरसेवक उमेश कापुरे, समितीचे सदस्य अनिल म्हस्के, मंगेश बिडवे, तसेच चंद्रकांत बर्दे, संतोष शिंगणे, नितीन राजपूत, गोटू शर्मा परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान बैठकीत आ. संजय गायकवाड यांनी बाजू मांडताना बुलडाणा जिल्हा हा राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे माहेर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असल्याने बुलडाणा जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे व देशाकरीता प्रेरनादायी आहे. विशेष बाब म्हणून बुलडाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्याने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असला पाहिजे असे मत मांडले. त्यावर ना. अनिल परब यांनी तात्काळ प्रस्ताव बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव बोलावून संगम चौकातील ए. टी. ही महामंडळाची जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता नाहरकत देण्याचे संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘बिग बॉस’ १४ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
- बिहारचं ठरलं ! तीन टप्प्यात मतदान तर १० नोव्हेंबरला लागणार निकाल
- …तर शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार – गोपीचंद पडळकर
- शिवसेनेने शब्द पाळला; राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
- विनायक राऊतांनी टीका करण्यापेक्षा खुलासा करावा – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

