🕒 1 min read
मुंबई : राज्यात साध्य शिवसेना-भाजप असा संघर्ष पहावयास मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद, तसेच कर्नाटक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट या सर्व मुद्द्यांनी महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athavale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, “राज्यात सध्या सुरू असलेले भांडण मिटलं पाहिजे असे आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पुढाकार घेऊन संजय राऊत यांना समज द्यावा, असा सल्ला देत दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. त्यामुळे शिवसेना-भाजपने एकत्र यायला पाहिजे.”
तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही आठवले यांनी लगावला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक असून केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. असेही आठवले यांनी म्हटले आहे.
आठवलेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया-
“भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले यांची मनापासून इच्छा दिसून येत आहे. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणारे जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप-सेना एकत्र येतील की नाही ते मला माहिती नाही.
महत्वाच्या बातम्या:
- “तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब”, खडसेंचा गुलाबरावांवर पलटवार
- बीसीसीआयला पत्रकाराचे नाव सांगणार नाही साहा; कारण देत म्हणाला…
- वर्ल्ड कप आधीच भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
- दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक दावा; म्हणाले,”सचिन वाझेंच्या मर्सिडीजमधून…”
- आणि तेजस्वी यादव यांना आठवले अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
