Share

वर्ल्ड कप आधीच भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मार्च महिन्यात आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. मात्र या आधीच भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू वनीथा वीआरने निवृत्ती जाहीर केली आहे. तिने ट्विटर अकाउंटवर एक संदेश लिहीत चाहत्यांना या संबधी माहिती दिली आहे.

वनीथाने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले होते. तिने ट्विटरवर टाकलेल्या पोस्ट मध्ये सगळ्यांचे आभार मानले आहे. तिने लिहले ” १९ वर्षांपूर्वी, जेव्हा मी खेळायआयसीसी ला सुरुवात केली. तेव्हा मी फक्त एक लहान मुलगी होते जिला खेळाची आवड होती. आजही माझं क्रिकेटवरचं प्रेम तसंच आहे. जे बदलत आहे ती माझी दिशा आहे. माझे मन म्हणते खेळणे सुरू ठेव, माझे शरीर मात्र थांबायला सांगत आहे. मी त्याचे ऐकण्याचे ठरवले आहे. माझे बूट टांगण्याची वेळ आली आहे, मी या पोस्टद्वारे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.”

https://twitter.com/ImVanithaVR/status/1495725838750334984?s=20&t=_Eo0ggiOeffWv9WfGIBa4Q

वनीथाने २०१४ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६ ते २०१८ दरम्यान, वनिताने ६ वनडे आणि १६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्या लहान कारकिर्दीत, बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या वनीथाने भारतासाठी ८५ एकदिवसीय धावा आणि टी २० क्रिकेटमध्ये २१६ धावा केल्या. वनीथाने तिच्या आयुष्यातील पुढील वेळ तरुण क्रिकेटपटूंना समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!