🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला एका पत्रकाराने मुलाखतीसाठी छळल्याचा आरोप त्याने केला होता. पत्रकाराने केलेल्या धमकीचे मेसेजचे स्क्रिनशॉट देखील साहाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बीसीसीआयने यावर कारवाई करण्याची तयारी केली आहे. मात्र आता साहाने धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव जाहीर करणार नसल्याचे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
श्रीलंकेच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय संघात साहाची निवड झाली नव्हती. याप्रकरणी मुलाखत दे म्हणून पत्रकाराने मेसेज द्वारे धमकी दिली होती. साहाने अज्ञात पत्रकाराचा एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्याने क्रिकेटरची कधीही मुलाखत न घेण्याची धमकी दिली आणि ‘मी अपमान नमतेपणाने घेत नाही’ असे लिहिले. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले कारण साहाला चाहत्यांचा आणि क्रिकेट समुदायाचा पाठिंबा मिळाला. मात्र साहाने “मी कोणाचेही करिअर उध्वस्त करू इच्छित नाही” म्हणत पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दर्शवला आहे.
साहाने सांगितले ” मला अद्याप बीसीसीआयकडून कोणताही संदेश मिळालेला नाही. जर त्यांनी मला पत्रकाराचे नाव सांगण्यास सांगितले, तर मी त्यांना सांगेन की कोणाच्या तरी कारकिर्दीला हानी पोहोचवणे, एखाद्या व्यक्तीला खाली खेचणे हा माझा हेतू नव्हता. म्हणूनच मी माझ्या ट्विटमध्ये नाव उघड केले नाही. ही माझ्या आई-वडिलांची शिकवण नाही. माझ्या ट्विटचा मुख्य उद्देश हा होता की मीडियामध्ये कोणीतरी खेळाडूच्या इच्छेचा अनादर करत अशा गोष्टी करत आहे हे उघड करणे गरजेचे होते. ज्याने हे केले आहे त्याला ते चांगलेच माहीत आहे. मी ते ट्विट पोस्ट केले कारण मला इतर खेळाडूंनी अशा गोष्टींना सामोरे जावे असे वाटत नव्हते. मला संदेश द्यायचा होता की जे केले गेले ते चुकीचे आहे आणि ते पुन्हा कोणीही करू नये.”
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्ड कप आधीच भारतीय महिला क्रिकेटच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
- दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक दावा; म्हणाले,”सचिन वाझेंच्या मर्सिडीजमधून…”
- आणि तेजस्वी यादव यांना आठवले अजित पवार
- नागपूरमध्ये भाजप नगरसेवकांचे धाबे दणाणले
- राजकारण करताना सभ्य भाषेचा वापर करावा ; जयंत पाटील यांचा सर्वांनाच सबुरीचा सल्ला म्हणाले …
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
