Share

“तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब”, खडसेंचा गुलाबरावांवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

जळगाव: शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु असून लगातार ते एकमेकांवर वार करत आहे. काल (२० फेब्रुवारी) गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना चारी मुंड्या चीत नाही केल्या,तर पाटील नाव लावणार नाही. असे म्हटले होते. यावरच आता खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव (Gulabrao Patil) तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका केली आहे.

जिल्ह्यातील विकास कामावरून बोलताना बाळ कुणाचे, बारसे कुणाचे, मात्र डफडं ते वाजवत असल्याचे खडसेंनी म्हटले आहे. तसेच आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचे नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका. असा इशाराही खडसेंनी दिला आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

“काही लोक माझ्याबद्दल नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. कडाला कड लावून बोलवं, चारीमुंड्या चीत करूनचं हा पाटील नावाचा नाही निघाला तर गुलाबराव नाव लावणार नाही”, असे थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच त्यांना जे जमलं नाही ते मी जमवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते माझ्यावर व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात ही गद्दारांना जागा नव्हती. असेही त्यांनी म्हटले होते.

दरम्यान दुसरीकडे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याने राजकारणात अनेक चर्चना उधान आले आहे. गेल्या काही दिवसापासून गुलाबराव पाटील व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय युद्ध सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेची ठरते आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!