🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणी धक्कादायक दावा केला आहे.(Nitesh Rane shocking claim in Disha Salian case) त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “दिशा सालियन (Disha Salian) हिला ८ जूनच्या रात्री काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडेही काळ्या रंगाची मर्सिडीज आहे. ही गाडी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दिशा सालियनला याच गाडीतून घरी नेण्यात आले का”, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
तसेच दिशाच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी ९ जूनला सचिन वाझे निलंबन रद्द होऊन पुन्हा पोलीस दलात रुजू झाले, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मालवणी पोलिसांवरही शंका उपस्थित केली आहे. मालवणी पोलिसांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद राहिली आहे. आता मालवणी पोलीस ठाण्याला महिला आयोगाकडे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ८ जूनच्या रात्री पार्टीत उपस्थित असणारा आणि दिशा सालियनसोबत राहणारा रोहन राय कुठे आहे? मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि मालवणी पोलिसांना दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणाच्या अहवालाविषयी विचारणा केली आहे. महापौरांच्या या कृतीमुळे राज्य सरकारने स्वत:चीच कबर खणली आहे. या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मालवणी पोलिसांचा तपास संशयास्पद होता म्हणूनच हे प्रकरण सीबीआकडे देण्यात आले. आता त्याच पोलीस ठाण्याला महिला आयोगाकडे अहवाल देण्यास सांगितले जात आहे. हे किती योग्य आहे? असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.
Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?— Nitesh Rane (@NiteshNRane) February 22, 2022
N because the Malvani police station didn’t do a free n fair investigation the case was given to the CBI..
right?
N now the same police station is been asked to submit a report by the state women commission?
How fair is that?
Who r they trying to save?— Nitesh Rane (@NiteshNRane) February 22, 2022
दरम्यान याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आणि तेजस्वी यादव यांना आठवले अजित पवार
- नागपूरमध्ये भाजप नगरसेवकांचे धाबे दणाणले
- राजकारण करताना सभ्य भाषेचा वापर करावा ; जयंत पाटील यांचा सर्वांनाच सबुरीचा सल्ला म्हणाले …
- लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी ; म्हणाले
- मिसळ खातानाचे फोटो टाकत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
