Share

प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला

Published On: 

🕒 1 min read

हरियाणा : शनिवारी दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त समारोहाला संबोधित करताना, हरियाणातील जिंद येथे इंडियन नॅशनल लोक दल आयोजित कार्यक्रमात जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधत टोलेबाजी केली. यावेळी ‘प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत’, असे अब्दुल्ला म्हणाले.

यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या दोन वर्षानंतरही एकाही व्यक्तीला नोकरी मिळाली नाही. केंद्राने काश्मीरमध्ये ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. परंतु तसे झाले नाही.’ तसेच ‘काश्मीर भारताचा भाग कधी नव्हता? आम्ही गांधींचा भारत निवडला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणालो की, आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार. जे लोक कलम ३७० रद्द करून भारताला बळकट केल्याचा दावा केला आहे, त्यांना मी सांगेल की त्यांनी भारताला कमकुवत केले आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे मार्ग बदलावे लागतील’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना अब्दुल्ला म्हणाले की,’अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी भांडण थांबवले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी मित्र राहिलात तर तुम्ही समृद्ध व्हाल. आज आमचे मित्र कुठे आहेत? नेपाळ, भूतान किंवा बांगलादेश आपले मित्र आहेत का? आपण अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलर्स खर्च केले. आज अफगाणिस्तान आपला मित्र आहे का? लहान भावाला सोबत घेतल्यासच घर समृद्ध होईल, हे मोठ्या भावाला हे समजले पाहिजे’ असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!