मुंबई : ९०च्या दशकात गाजलेल्या ‘महाभारत’ या दुरचित्रवाणी मालिकेतील देवराज इंद्राची भूमिका साकारणारे अभिनेता सतिश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. प्रसिद्ध निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती.
एकेकाळी सतीश कौल हे हिंदी तसेच पंजाबी चित्रपटातील एक गाजलेले नाव होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १९७४ ते १९९८ काळात ३०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे. सतीश कौल यांनी अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्या सोबत काम केले आहे. लॉकडाउनच्या काळात त्यांनी सोशल मीडीयाच्या द्वारे आर्थिक मदतीची मागणी केली होती. लॉकडाउनदरम्याम त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती.
https://twitter.com/ashokepandit/status/1380821471006662661
त्यावेळी त्यांनी सोशल मीडीयावर पोस्ट करत म्हणाले की, मला अभिनेता म्हणून खुप प्रेम मिळाले. आता मला एक माणूस म्हणून मदतीची गरज आहे. सतीश कौल यांनी ९०च्या दशकातील महाभारत या मालिकेत ‘देवराज इंद्रा’ची भूमिका साकारली होती. २०११ मध्ये मुंबई सोडून ते लुधियानामध्ये राहत होते. सतीश कौल यांनी कर्मा, राम लखन, आंटी नं. १ या चित्रपटात काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांची याच आठवड्यात सीबीआय करणार चौकशी ?
- Good bye Ma, अंत्यविधीला उपस्थित नसलेल्या अमेरिकेतील मुलाची आईला ‘अशीही’ श्रद्धांजली
- आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो; फडणवीसांच सूचक भाष्य
- नेहा कक्करच्या गाण्यावर अन्नु मलिक म्हणतोय ‘मला स्वतःच्या कानाखाली मारावसं वाटतंय’
- लॉकडाऊन लागल्यास औद्योगिक क्षेत्राला बसणार मोठा फटका


