बीड : जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये मंगळवार पासून (दि. ३०) सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून करोना विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मिडियावरुन दिली आहे.
बीड जिल्हाभरामध्ये खुप मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पाच दिवसांपुर्वी बीड जिल्हामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. तर कोराना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अंशत: लॉकडाऊन देखील केले होते. परंतू तरीही कोराना रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासानाच्या पातळीवर घेण्यात आला होता. तर कोरानाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सरकारने शेवटी लॉकडाऊन करण्याचा निर्णय देखील घेतला होता. परंतू आता देखील कोराना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. या वर लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या हेतुने लॉकडाऊनचा निर्णय घेवून आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन खुप मोठ्या प्रमाणात व्यापक प्रयत्न करत होते.
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून करोना विषयक नियमांचे पालन करावे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 29, 2021
दरम्यान बीड शहरासह जिल्हाभरात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. परंतू मंगळवारपासून या लॉकडाऊनमध्ये सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत शिथिलता देण्याच्या सुचना सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. अशी माहिती सोशलमिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. तर आता बीड शहरातील नागरिकांना उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
या वर बीड येथील नागरिकांनी मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असलयाने कोराना रुग्ण वाढीबाबत कोणताही आकडा कमी झालेला नाही. परंतू नागरिकांची गरज लक्षात घेता ही सहा तासांची सुट देण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

