अहमदनगर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला असून राज्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.
ग्रामविकास मंत्री तथा अहमनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासोबतच कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी सूचना दिल्या आहेत. यानंतर लॉकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. अशीच संख्या वाढत गेली तर संक्रमण साखळी तोडण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे.’ असा इशाराच मुश्रीफ यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती’
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- फडणवीसांकडे आम्ही भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो; संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला
- पाथरीतील सेलू कॉर्नर परिसरातून पावणे पाच लाखाचा गुटका जप्त, एकास अटक
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

