मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
परंतु आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक सूचक वक्तव्य केल आहे. लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मदत कशी करता येईल याविषयी सरकार सध्या चर्चा करत आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ‘लॉकडाऊन कधी लागेल हे सांगता येत नाही. काही महत्वाचे दिवस आहेत. १४ एप्रिल संपू द्यावं लागेल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात गरीब घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबतही चर्चा सुरु असल्याचं टोपे म्हणाले.
ज्यात अनेक ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट किंवा टँक उपलब्ध नाहीत. राज्यात सर्व रुग्णालयात असे टँक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी डीपीडीसीतून पैसे खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे, तसेच सध्या असलेले लिक्विड ऑक्सिजन प्लांट पुरत नाहीत. त्यामुळे हवेतला ऑक्सिजन घेऊन प्युरिफिकेशन करुन पुरवठा करतो, छोट्या मशीनमधून हा ऑक्सिजन घेता येतो, असंही टोपे म्हणालेत.’ असं राजेश टोपे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही’
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन, नानावटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
- देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाही विचारात घेतले नव्हते – नवाब मलिक
- मोठी बातमी : दहावी बारावीच्या परीक्षा ढकलल्या पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

