पणजी – देशात सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली आहे. देशात काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर काही ठिकाणी टाळेबंदी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाउन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तत्पूर्वी कर्नाटकमध्ये देखील लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे.
दरम्यान,इकडे महाराष्ट्रात 30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. असल्याचे दिसत आहे .15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- स्टाईलिश स्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण; चाहत्यांनी केली प्रार्थना
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप
- नायब राज्यपालांच्या हाती एकवटणार आता दिल्लीची सत्ता, नवा कायदा झाला लागू


