Share

आरोग्य विभागातील पदे रिक्त, यंत्रणेवर अतिरिक्त ताण! तातडीने पदे भरण्याची आ. सतिश चव्हाणांची मागणी

Published On: 

औरंगाबाद :  राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ ची रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी शनिवारी (दि. १७) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकट काळात आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिकांपासून ते आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युध्दातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. मात्र हे सैन्य तोकडे पडत असून पदांच्या तुटवड्याचा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहीला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात ८ मार्च २०२१ रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यात जवळपास १८,३९७ पदे रिक्त असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते. अनेक ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अशी महत्वाची पदे रिक्त असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गातील पदे सुध्दा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

गोर गरीब रूग्णांसाठी महत्वाचा आधार म्हणून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला (घाटी) ओळखले जाते. मात्र याठिकाणी २०१० पासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. याठिकाणी वर्ग १ ची २४, वर्ग २ ची ३७, वर्ग ३ ची २१६ तर वर्ग ४ ची २९८ अशी जवळपास ५७५ पदे रिक्त आहेत.

आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना कोरोना बाधित रूग्णांबरोबरच नॉन कॉविड रूग्णांवर देखील उपचार करावे लागत आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ ची रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!