Share

शिवभोजनाचा ‘सामना’ करण्यासाठी नांदेड भाजपचाही मोफत डबा

Published On: 

नांदेड : भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात कोविड आजारावर उपचार घेत असलेल्या रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना जेवण पुरवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभारंभ करण्यात आला आहे.  करण्यात आले.  आज करण्यात आला. दररोज १ हजार रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण देण्यात येणार आहे.

शहरासह नांदेड जिल्हाभरामध्ये कोराेना संसर्गाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच रुग्णांलयामध्ये बेडची संख्या देखील अपुरी पडत आहे. तसेच रुग्णांची संख्या खुप वाढत आहे, तर ऑक्सिजनचा तुटवडा देखील होत आहे. दरम्यान नांदेडसह महाराष्ट्रामध्ये संचारबंदीची घोषणा करुन ती सुरु देखील झाली आहे. त्यामुळे रुग्णांलयातील उपचार घेणारे तसेच त्यांचे नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांची खुप परेशानी होत आहे. तसेच शहरातील सर्व गरजु , गरिब, उपाशी असलेल्यांना या माध्यमातून चांगल्या दर्जाचे जेवन भारतीय जनता पार्टीचे खासदार हे उपलब्ध करुन देणार आहे.

याच बरोबर भाजपचे कार्यकर्ते गरजुंना ते जेथे आहेत तेथे जेवणाचा डबा पुरवणार आहेत. तसेच रुग्ण तसेच नातेवाईकांसोबत सेवा बजावत असेलेले पोलिस, आरोग्य कर्मचारी, गरिब तसेच गरजुंना देखील या माध्यमातून डबा पुरवणार असल्याचे मत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितले. तर शहरासह परिसरातील सर्व भागामध्ये जेवनाचे डबे पुरवण्यात येणार आहे. तर मी स्वत: या बाबत स्वयंपाक करणाऱ्या माणसांना जेवनाचा डबा तयार करण्याचे सांगून खाण्यायोग्य जेवन गरजुंसाठी देण्याचे ठरवले आहे. मला या कामासाठी शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पुढाकार घेत आहेत. या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरु केला असल्याचेही या वेळी खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!