Share

लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूला जामीन मंजूर, ‘या’ अटींची करावी लागणार पूर्तता

Published On: 

नवी दिल्ली- दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. दीप सिद्धूला तीस-तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आरोपी दीप सिदधूने स्वत: निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच जामीन देण्याची विनंतीसुद्धा केली होती. या प्रकरणात मला फसवलं जात असल्याचा आरोप त्याने केला होता, तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिद्धू मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्याला त्याचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर तो वापरणार असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करण्यास सांगितली आहे.

दरम्यान, फोनचं लोकेशन २४ तास ऑन ठेवण्याबरोबर फोन स्विच ऑफ करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अट ठेवली आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलना दरम्यान २६ जानेवारी रोजी दीप सिद्धूसह आणखी काही आरोपींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांच्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान लाल किल्ला परिसरात तसंच दिल्लीच्या आणखी काही भागांत हिंसाचार घडला होता. या प्रकरणात दीप सिद्धू हा मुख्य आरोपी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!